लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करत मातृत्व लादणाऱ्या संशयितास कोठडी

Aug 10, 2024 - 11:11
Aug 10, 2024 - 11:38
 0
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करत मातृत्व लादणाऱ्या संशयितास कोठडी

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करत तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या संशयिताला न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोहसिन अब्दुलगनी शेख (३७, रा. चर्चरोड, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या तक्रारीनुसार, संशयित मोहसिन शेख याने पीडितेपासून आपले पहिले लग्न झाले असल्याचे लपवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तरुणी या आमिषाला बळी पडल्यानंतर मोहसिनने सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीत तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडितेने एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिला मोहसिनचे या पूर्वीच लग्न झालेले असल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन गुरुवारी रात्री शहर पोलिसांनी मोहसिन शेखला अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow