पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा समारोप; मनू भाकर-श्रीजेश भारताचे ध्वजवाहक

Aug 12, 2024 - 11:02
 0
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा समारोप; मनू भाकर-श्रीजेश भारताचे ध्वजवाहक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली. 


 
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा फ्रान्समधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर झाला. हे फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. 
 
या सोहळ्यासाठी स्टेडियमचे थिएटरमध्ये रूपांतर करण्यात आले. स्टेडियमचा नजारा पाहण्यासारखा होता.
 
या सोहळ्यात अनेक कलाकारांनी सर्वांचे मनोरंजन केले. या समारोप सोहळ्यात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ देखील उपस्थित होता.

या सोहळ्यात एक परेडही झाली, ज्यामध्ये सर्व खेळाडू आपापल्या देशांचे झेंडे घेऊन दिसले.


 
भारताकडून हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर ध्वजवाहक म्हणून दिसले.
 
समारोप समारंभात स्टेडियममध्ये लेझर शो झाला. या लेझर शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow