चिपळूण : लोटे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी सुरू

Aug 12, 2024 - 11:07
 0
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी सुरू

चिपळूण : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे येथील लोटे परशुराम असोसिएशनच्यावतीने इंडस्ट्रीयल एमआयडीसीचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी खेड तहसीलसमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत या ठिकाणी काम सुरू झाले असून आज सोमवार १२ रोजी खेड तहसीलदारांसमवेत बैठक होणार आहे.

याबाबत लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी माहिती दिली आहे. लोटे एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक करणे धोकादायक बनले होते. कंपन्यांमध्ये येणाऱ्या गाड्या तसेच टँकरची वाहतूक करणे जिकरीचे बनले होते. या संदर्भात लोटे परशुराम इंड. असो. ने आक्रमक भूमिका घेत एमआयडीसीचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले. याची दखल घेत एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले असून १२ रोजी खेड तहसीलदार यांच्यासमवेत बैठक होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow