Ratnagiri : नवीन पोर्टल सुरू नसल्याने लाडकी बहीण योजनेतील नोंदणी रखडली

Aug 12, 2024 - 10:56
Aug 12, 2024 - 10:58
 0
Ratnagiri : नवीन पोर्टल सुरू नसल्याने लाडकी बहीण योजनेतील नोंदणी रखडली

साखरपा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आता शासनाने सुरू केलेल्या नवीन पोर्टलबाबत अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. हे पोर्टल अद्याप सुरळीत सुरू न झाल्याने उर्वरित बहिणींच्या नोंदणीचा प्रश्न उभा राहिला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी नवीन पोर्टल सुरू होऊन आता दहा दिवस होऊन गेले आहेत. असे असले तरी हे पोर्टल अद्याप सुरळीत सुरू झालेले नाही. पोर्टलवर नवीन नोंदणी करताना आधार क्रमांक टाकला असता त्या नंबरला लिंक करणाऱ्या मोबाइल नंबरला ओटीपी पाठवला जातो. तो नंबर पोर्टलवर टाकला असता नंबर चुकीचा असल्याचे समजते. त्यामुळे नवीन नोंदणी होत नाही.

गेले दहा दिवस अडचणी सुरू असल्यामुळे अनेक महिलांची नोंदणी थांबली आहे. नोंदणी करण्याचे काम मुख्यत्वे अंगणवाडी सेविका करत आहे. दिवस दिवस प्रयत्न करून एकही नवीन नोंदणी होत नसल्याचा अनुभव त्यांना येत आहे. त्यामुळे पोर्टल तातडीने दुरुस्त व्हावे आणि ते दुरुस्त होईपर्यंत जुने अॅपही सुरू राहावे, अशी मागणी नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका करत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow