खेड : दहिवलीत संरक्षक भिंतीची मागणी

Aug 21, 2024 - 10:21
Aug 21, 2024 - 12:34
 0
खेड : दहिवलीत संरक्षक भिंतीची मागणी

खेड : तालुक्यातील दहिवली येथे १० वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनासह दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे सहा वाड्यांतील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी अष्टकोशी विकास मंडळाच्या वतीने तहसीलदार सुधीर सोनावणे यांना निवेदनाद्वारे केली आहे. दहिवली येथील कोकमवाडी, फणसवाडी, निकमवाडी, पवारवाडी, राजवाडीतील वस्त्या डोंगर दरडींलगत लागून आहेत. १० वर्षांपूर्वी या ठिकाणी भूस्खलन होऊन भेगाही पडल्या आहेत. सद्यःस्थितीत पावसाचे पाणी उतरणीवरून खाली न येता भेगांमध्ये मुरते. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. या सहाही वाड्यांतील वरकस दरडींचे सर्वेक्षण करून ग्रामस्थांना भयमुक्त करावे, यासाठी संरक्षक भिंती बांधाव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. संरक्षक भिंती न उभारल्यास माळीण किंवा वायनाडसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow