राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं : रोहित पवार

Aug 12, 2024 - 12:09
 0
राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं : रोहित पवार

मुंबई : राज ठाकरेंचा (Raj Thackeray) मी फॅन होतो. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केलं.

भाजपला मतविभागणी करायची आहे. लोक त्यांना आता सुपारीबाज पक्ष म्हणत असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याबाबत राज ठाकरेंनी बोलावं असंही रोहित पवार म्हणाले.

सत्तेतील लोकांना लाडकी खुर्ची जपायचीय

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. ते गुणरत्न सदावर्ते यांनी हाणून पाडलं. ते फडणवीस यांचे जवळचे असल्याचे रोहित पवार म्हणाले. ते सत्ताधारी लोकांना खेळवत ठेवत आहेत. स्पष्ट भूमिका सत्तेतील लोकांनी घेतली पाहिजे. सत्तेतील लोकांनी सांगावं की आम्हाला जमणार नाही. त्यांना लाडकी खुर्ची जपायची आहे. सुपारी बाजांना याना सांभाळायचं असल्याचे रोहित पवार म्हणाले.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर रोहित पवारांची टीका

विधानसभा निवडणुकीत कोणाला खड्यासारखं बाजूला करायचं याचा निर्णय लोक घेतील असे रोहित पवार म्हणाले. म्हाडाचे फ्लॅट कार्यकर्त्यांना दिल्याचा प्रकार होत आहे. महायुतीचे सरकार नेहमी थट्टा करत असल्याचे पवार म्हणाले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही रोहित पवारांनी टीका केली. माझा व्यवसाय तुम्ही काय काढताय. ते ED काढेल, मी कष्टाने कमावलं आहे. बार्शीत दहशितीच वातावरण आहे. ED माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत असंही रोहित पवार म्हणाले.

काय म्हणले होते राजेंद्र राऊत?

फक्त बारामतीचा विकास होणे म्हणजे संपूर्ण राज्याचा आणि देशाचा विकास झाला असं समजू नका. बारामतीचा पण करा. परंतु इतर तालुके कोणी दुष्काळी ठेवले हे रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारलं असतं तर बर झालं असतं अशी टीका आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर केली होती. माझ्यावर टीका करताना जमिनीचा विषय काढला. माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय काढला. मराठी माणसाने व्यवसाय करणे हा गुन्हा नाही. आम्ही प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो, असे राजेंद्र राऊत म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow