रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरलेला; उन्हाचा मारा सुरू

Aug 13, 2024 - 09:56
Aug 13, 2024 - 09:58
 0
रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरलेला; उन्हाचा मारा सुरू

रत्नागिरी : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच श्रावणी सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला. गेले चार दिवस पावसाने पाठ फिरविली असून कडक उन्हाचा मारा जिल्ह्यात सुरू झाला आहे. अधुनमधून पडणाऱ्या मध्यम सरींचा अपवाद वगळता बहुतांश भागात कोरडे वातावरण आहे. त्यामुळे आता ताप वाढू लागला असून खरीप लागवड क्षेत्रात पावसाने फिरविलेली पाठ चिंता वाढवणारी ठरत आहे. दरम्यान, सोमवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात केवळ ४.९१ मि. मी. च्या सरासरीने एकूण ४४.२० मि. मी. पाऊस झाला.

उत्तर ते दक्षिण व्यासावर हवेच दाब वाढल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर ओसरलेला राहणार असून पाऊस उघडीप घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या शनिवारापासून कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर ओसरलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पाट फिरविली आहे. 

त्यामुळे उन्हाचा ताप वाढू लागला असून तापमानतही वाढ होत आहे. वाढणारे तापमान हे भात लागवड क्षेत्रात चिंता वाढविणारे ठरत आहे. अनेक भगात पावसाने पाठ फिरविल्याने भात रोपांच्या वाढीस प्रतिनकूल ठरण्याची शक्यता आहे तर वाढलेल्या तापमानामुळे करपा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवसातून एकदा तरी पिक पाहणी करुन खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. दरम्यान, शनिवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत चिपळूण तालुक्याच अपवाद वगळता सर्व तालुक्यात एक अक अंकी पावसाची नोंद झाली. सर्वच तालुक्यात पावसाचा जोर ओसरलेला आहे. रविवारी पावसाने जवळपास सुट्टी घेतली. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून २७९१ मि. मी. च्या सरासरीने एकूण २५ हजार १२५ मि.मी. पाऊस झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow