संगमेश्वरमध्ये गांजासह तरुणाला अटक

Aug 14, 2024 - 10:20
 0
संगमेश्वरमध्ये  गांजासह तरुणाला अटक

संगमेश्वर : कसबा काझी मोहल्ला येथील अर्श साबीर काझी हा संगमेश्वरजवळच्या शास्त्री पुलाच्या खालील बाजूस पुलाच्या खांबाच्या आडोशाला अमली पदार्थ स्वतःजवळ बाळगून त्याद्वारे गांजासदृश सेवन करत असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलिस सचिन कामेरकर, प्रमोद रामपुरे, मनवल, सोडमिसे,आव्हाड, कोलगे आदी पोलिसांनी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला.

या वेळी अर्श साबीर काझी गांजासदृश पदार्थ सेवन करत असल्याचे मिळून आला आहे. ११ हजार रुपयांचा गांजा आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत प्रमोद गुलाब रामपुरे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow