रत्नागिरी : जिल्हा परिषद आयोजित स्पर्धेमध्ये 'जलधार' लघुपटाला प्रथम क्रमांक

Aug 14, 2024 - 10:14
Aug 14, 2024 - 10:16
 0
रत्नागिरी : जिल्हा परिषद आयोजित स्पर्धेमध्ये 'जलधार' लघुपटाला प्रथम क्रमांक

मंडणगड : जिल्हा परिषद आयोजित जलजीवन मिशन अंर्तगत घेण्यात आलेल्या लघुपट निर्मिती स्पर्धेत मंडणगडच्या सचिन माळी लिखित, दिग्दर्शित जलधार या लघुपटाता प्रथम क्रमांक मिळाला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांच्या हस्ते जलधार लघुपुटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला ३१ हजार रुपये, सन्मानचिन्ह. सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आहे.

(कै.) शामराव पेजे सभागृहात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. दुसरा क्रमांक तहान या लघुपटाला मिळाला आहे. दोन्ही लघुपट सभागृहात सर्वांपुढे सादर करण्यात आहे. नागरिकांमध्ये पाण्याचे महत्व वाढवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल या योजनेची जनजागृती होण्याच्या अनुषंगाने या योजनेची माहिती. हेतू, उद्दिष्टे तसेच त्याची कृतिशील प्रक्रिया व त्यातून होणारे सकारात्मक दृश्य परिणाम अशा अनेक निकषांच्या आधारे जलसंवर्धनाचा संदेश देणारी लघुपट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत जलधार लघुपटला प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचे लेखन व दिग्दर्शन सचिन माळी, छायांकन व संकलन विधान पवार, कला दिग्दर्शन अतुल पवार, गायन दीप जोशी, सहाय्यक आकाश पवार यांनी केले असून, पार्वतीबाई धामणे, अतुल पवार, भिकू माळी, नीलेश जाधव, सुप्रिया जाधव, प्रतीक्षा माळी, तुकाराम कीजबिले यांच्यासह पालेगावातील २५ कलाकारांनी सहभाग घेतला. हा पुरस्कार लघुपटाचे दिग्दर्शक सचिन माळी, अभिनेता अतुल पवार, आकाश पवार यांनी स्वीकारला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow