जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण

Aug 14, 2024 - 14:05
 0
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण

नवी दिल्ली : म्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याल आलं आहे.

डोडा जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीदरम्यान, भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनला वीरमरण आलं आहे, अशी माहिती एका संरक्षण अधिकाऱ्याने दिली आहे.

डोडा येथील पटनीटॉपमधील जंगलामध्ये सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये काल संध्याकाळपासून चकमक सुरू आहे. येथून दहशतवादी हत्यारं सोडून पळाले होते, अशी माहिली लष्करानं दिली आहे घटनास्थळावरून अमेरिकन बनावटीची एम४ रायफल जप्त करण्यात आली आहे. तर तीन बॅगमधून काही स्फोटकंही सापडली आहेत. दरम्यान, हे दहशतवादी अकर भागातील एका नदीकिनारी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर जवानांनी या भागाला घेराव घातला. लष्कराच्या हालचालींची कुणकूण लागल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात लष्कराचे एक वरिष्ठ अधिकारी गोळ्या लागून गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

काश्मीरमद्ये मागच्या पाच दिवसांमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. तर याच दिवशी उधमपूरमधील वसंतगडधील जंगलातही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. तर १० ऑगस्ट रोजी अनंतनागमधील कोकरानाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नायक प्रवीण शर्मा यांना हौतात्म आलं होतं. तर ३ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow