खेड : खवले मांजर तस्करी प्रकरणातील संशयिताला जामीन

Aug 14, 2024 - 10:03
Aug 14, 2024 - 14:04
 0
खेड : खवले मांजर तस्करी प्रकरणातील संशयिताला जामीन

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिराजवळील खवले मांजर तस्करी प्रकरणातील संशयिताची न्यायालयाने सोमवारी जामिनावर मुक्तता केली. दत्ताराम शामा कोंडके असे संशयिताचे नाव आहे. खवले मांजर तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने तिघांना जेरबंद केल्यानंतर आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील सहभागी संशयित पसार झाला होता. वनविभागाचे पथक गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाने महाड येथील राहत्या घरातून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow