साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आज 'युवा प्रबोधन'

Aug 14, 2024 - 10:09
Aug 14, 2024 - 14:11
 0
साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आज 'युवा प्रबोधन'

देवरुख: युवा सेना सहसचिव आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक प्रद्युम्न रवींद्र माने यांच्या कल्पनेतून दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील सर्व युवकांसाठी 'युवा प्रबोधन' नावाची व्याख्यान शृंखला आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन आणि त्यांचा सत्कार सभारंभ साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात होणार आहे. कोकण आपल्या विविधतेने नटलेला आहे, कोकणातील युवक सुद्धा शिक्षणात हुशार आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता आहे. हेच ओळखून युवा सेनेचे सहसचिव प्रद्युम्न माने यांनी कोकणातील युवकांसाठी हे प्रबोधन आयोजित केले आहे. या व्याख्यानास जिल्ह्यातील सर्व युवकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow