Breaking: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज निवडणूक आयोग करणार घोषणा

Aug 16, 2024 - 09:34
 0
Breaking: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज निवडणूक आयोग करणार घोषणा

मुंबई : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.

त्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.

कोणत्या राज्यात किती जागा

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.

काश्मीरमध्ये 90 जागांवर होणार मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.

9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow