सोन्याच्या दरात घसरण..

Aug 16, 2024 - 13:36
 0
सोन्याच्या दरात घसरण..

सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं असलं तरी चांदीची चमक वाढली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४०३ रुपयांनी कमी होऊन ७०३९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा दर ७०,७९३ रुपयांवर बंद झाला होता.

तर चांदीचा भाव बुधवारच्या ८०९२१ रुपये प्रति किलोच्या बंद दराच्या तुलनेत आज ८०५९८ रुपये प्रति किलोवर खुला झाला.

२३ कॅरेट सोन्याच्या आयबीजेएच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते ४०२ रुपयांनी स्वस्त होऊन ७०१०८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३६९ रुपयांची घसरण झाली आणि आज तो ६४४७७ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी कमी होऊन ४२७९३ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव २३६ रुपयांनी कमी होऊन ४११७८ रुपये झाला आहे.

विशेष म्हणजे सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७२५०१ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७२२११ रुपये आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटीनुसार २१०३ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ६६४११ रुपयांवर पोहोचलं आहे. त्यात जीएसटीची १९३४ रुपयांची भर पडली आहे.

१५८३ रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याचा भाव आता ५४३७६ रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा समाविष्ट नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८४१०४ रुपयांवर पोहोचला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow