National Film Award 2024 : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'वाळवी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर..

Aug 16, 2024 - 13:54
 0
National Film Award 2024 : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'वाळवी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर..

मुंबई : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपली छाप सोडली आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'वाळवी'ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित 'वारसा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'कार्तिकेय' 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 'पोनियिन सेल्वन 1' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. 'KGF Chapter 2' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 'केजीएफ चॅप्टर 2' ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना 'गुलमोहर'साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला.

> जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार...

- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर

- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी

- राष्ट्रीय चित्रपटांवर मराठीची छाप

- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला दोन पुरस्कार

- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार

- 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार

- सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या 'वारसा'लाही राष्ट्रीय पुरस्कार

- वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार

- आदीगुंजन (Murmurs of the Jungle) या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow