ladki bahin yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यावर आले का? 'असं' करा चेक

Aug 17, 2024 - 16:43
 0
ladki bahin yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यावर आले का? 'असं' करा चेक

मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'(Majhi ladki bahin yojana) योजना शहर आणि गाव पातळीवर चर्चाचा विषय झालाय. शेतकरी भगिनींनो तुम्ही अर्ज केलाय का?

नसेल केला तर चिंता नको काय करायचे? त्याविषयीची माहिती घेऊ या.

महिलांच्या सक्षमीकरण आणि आर्थिक सहाय्याकरिता राज्य सरकारने ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'' (Majhi ladki bahin yojana) अंमलात आणली आहे. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही अर्ज प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही अर्जप्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन अर्जाकरता तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, प्रभाग समितीमध्ये संपर्क साधू शकता. तर, ऑनलाईन अर्जाकरिता ॲप आणि वेबसाईटचा वापर करू शकता.
अर्ज करताना आधार कार्डावर तुमचे जे नाव असेल त्याच नावाने अर्ज करावा लागणार आहे. शिवाय उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे अथवा केशरी रेशनकार्डव्दारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल. तसेच एक हमीपत्र भरून देणे गरजेचे आहे. याशिवाय आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आणि देणे बंधनकारक आहे. दिलेल्या बँक खात्याचे केवाइसी करुन घेणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे करा
* अर्ज भरताना तुम्ही बँकेचं नाव, बँकेची शाखा, तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे.
* तुमचे आधार कार्ड बँक अकाऊंटशी जोडणे आवश्यक आहे.
* योजनेच्या लाभासाठी अर्जदार महिलांनी अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडिंग आहे की नाही, याबाबत खात्री करणे गरजेचे असून, डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी ही बाब आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आता शासनाने नवीन वेबसाईट सुरु केली आहे.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही फाॅर्म भरु शकता.

https://ladakibahin.maharashtra.gov.in/scheme-information

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज !

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज केलेल्या सर्व पात्र लाभार्थींना जुलैपासून दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ मिळणार आहे.

रक्षाबंधन पूर्वीच महिलांना भेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर १७ ऑगस्टपर्यंत बँक खात्यात पैसे टाकण्याचे जाहीर केले होते. असे असतानाच महिलांच्या बँक खात्यात १५ ऑगस्ट रोजीच पैसे जमा केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची एकच झुंबड होत आहे.

आमचे कधी येणार ?
* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वीच जिल्ह्यातील काही महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. तर अनेक महिलांना अप्राप्त आहे. यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांची चिंता वाढली असून आमचे पैसे कधी येणार, यासाठी महिलांकडून आशा स्वयंसेविका, बँकांकडे विचारणा होत आहे.
* त्यासाठी एकदा आपला फॉर्म बघणे आवश्यक आहे. त्यात दिलेले असते पात्र, अपात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे या तीन भागात तुमचा अर्ज कुठे आहे ते पहाणे गरजेचे आहे.
* जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
* तेथे आवश्यक कागदपत्रांची जोडणी करावी, असे सांगितले असल्यास ती पूर्तता केल्यास तुम्हालाही योजनेचा लाभ मिळू शकतो.

लाडकी बहीण योजना कागदपत्रे (documents)
१. आधार कार्डनुसार अर्जामध्ये नाव नमुद करावे
२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/ १५ वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/ अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक
४. वार्षिक उत्पन्न - रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक,
५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राहय राहील.
६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow