गोळप नं.१ आणि दाभिळ शाळेत वह्या आणि छत्री वाटप कार्यक्रम

Jul 17, 2024 - 14:06
Jul 17, 2024 - 15:00
 0
गोळप नं.१ आणि दाभिळ शाळेत वह्या आणि छत्री वाटप कार्यक्रम

रत्नागिरी : येथील गोळप गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळप नं.१ आणि दाभिळ शाळा येथे माजी ग्रा.पं.सदस्य श्री.राजेश पावसकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.महेश भाटकर यांच्या माध्यमातून छत्री वाटप आणि वह्या वाटप करण्यात आले. सुरुवातीला दाभिळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शेलार आणि गोळप शाळा नं.१ चे मुख्याध्यापक श्री.काजवे गुरुजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी या कार्यक्रमासाठी ॲड. संदिप पावसकर, दिपक भाटकर, धनंजय पालकर, प्रदिप डोंगरे, अनिल संते, संजय संते,अभय संते, संतोष मेस्त्री, चंद्रकांत नारकर आणि शाळा समन्वय समिती अध्यक्ष सौ.राड्ये, सुधाकर संते तसेच दाभिळवाडी, मोरवठार,राड्येवाडी,बौध्दवाडी, संतेवाडी,डोंगर वाडी येथील ग्रामस्थ यांची प्राधान्याने उपस्थिती होती. शाळेच्या  मुख्याध्यापकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करुन या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करुन उपस्थित मान्यवर आणि सहकारी शिक्षक वृंद यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow