Weather Update Maharashtra : संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट

Aug 21, 2024 - 10:59
 0
Weather Update Maharashtra : संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. पुन्हा एकदा राज्यभरात पाऊस सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.

आज पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवेचा दाब अनुकूल होत असल्यामुळे राज्यात 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. मान्सून सक्रीय (Monsoon active) होण्याची सुरूवात मुंबई व पुणे शहरातून होणार आहे. येत्या 72 तासांमध्ये या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सून 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत असे सलग तीन आठवडे सक्रिय राहणार आहे. आज (बुधवारी 21 ऑगस्ट) संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Heavy Rain)सुरू आहे. तर मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस सुरू आहे. केरळ ते गुजरात भागात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात सक्रिय होत आहे.

संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट

मुंबई, पुणे शहराला आज (बुधवारी) या दोन्ही शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन शहरांवर क्युम्युनोलिंबस ढगांची गर्दी झाली आहे.या दोन शहरांसह आज संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. आज मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे.

राज्यात पुढील काही दिवस पाऊस सक्रीय असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी धरणसाठ्यातील पाणीसाठी वाढला असल्याचं चित्र दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow