अंदाज लागू न देता विधानसभेचा निकाल लावणार : जयंत पाटील

Jun 11, 2024 - 16:00
 0
अंदाज लागू न देता विधानसभेचा निकाल लावणार : जयंत पाटील

हमदनगर : काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे २५ वा वर्धापन दिन सोहळा अहमतनगरमध्ये झाला. सर्वच प्रमुख नेत्यांनी यावेळी भाषण केली. दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.

पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सूचना दिल्या.

जयंत पाटील म्हणाले की, या २५ वर्षांत आपल्या पक्षाने खूप मोठा पल्ला गाठला. पवार या ब्रॅण्डने आपल्याला तब्बल साडे सतरा वर्षे सत्ता दिली. अनेकांनी ही सत्ता उपभोगली. अनेक संकटाना पवार साहेबांनी तोंड दिलं. पण पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रेम करणारी लोक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे निकाल आले. पण या निवडणुकीत कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आणल्या. महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण पाहिली. पवार साहेब बारामतीत अडकले पाहिजे ही दिल्लीश्वरांची इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही असेही ते म्हणाले.

रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शरद पवार..!

अनेकांनी सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही आठ जागांवर निवडून आलो. तुम्ही आहे कुठे? असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला तसेच अनेक आमदार पक्ष सोडून गेले पण पुन्हा एकदा पक्ष पुढे आणण्याचे काम पवार साहेबांनी केले. पोरं शाळा सोडून गेले तरी शाळा बंद पडत नाही. हेडमास्तर पुन्हा नव्याने विद्यार्थी घडवत असतो. आमचा हेडमास्तर लय खमक्या आहे असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

अंदाज न लागू देता विधानसभेचा निकाल लावणार

मी पक्षाचा अध्यक्ष आहे, अनेकांनी माझे महिने मोजले, पण काळजी करू नका. मी काही मोदी, भाजपसारखी ४०० पार करण्याची घोषणा करण्याची चूक करणार नाही. अंदाज न लागू देता विधानसभेचा निकाल लावणार. महाराष्ट्रात नव्या चेहऱ्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चुकत असेल तर कानात सांगा, जाहीररित्या बोलणे टाळा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून येणे हे टीम वर्क आहे. आपल्याला टीम म्हणूनच राहिले पाहिजे. त्यामुळे चुक होत असेल तर कानात सांगा, जाहीररीत्या सांगू नका असे म्हणत त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. शेवटी त्यांनी मोदींप्रमाणेच राज्याच्या नेतृत्वाला लोकांनी नापसंत केलेलं आहे म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या चुकीच्या धोरणेही जनतेपर्यंत पोहोचवायची असे जयंत पाटील म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow