रत्नागिरी जिल्हा भंडारी भजन संघ आयोजित स्व. रेडीओ स्टार सुधाकर नागवेकर स्मृती अभंग गायन स्पर्धा संपन्न

Aug 21, 2024 - 10:54
 0
रत्नागिरी जिल्हा भंडारी भजन संघ आयोजित स्व. रेडीओ स्टार सुधाकर नागवेकर स्मृती अभंग गायन स्पर्धा संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भंडारी भजन संघ, रत्नागिरीच्या वतीने हातिसचे स्वर्गीय रेडीओ स्टार कै. सुधाकर नागवेकर स्मृतीप्रित्यर्थ रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी भैरव मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे तालुक्यातील भंडारी समाज बंधु-भगिनींसाठी अभंग गायन स्पर्धा संपन्न झाली.

या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील एकूण १५ स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपली अभंग गायनाची कला सादर केली. त्यामध्ये कु. पूर्वा संतोष नागवेकर हिने पहिला तर श्री. मंदार सुधीर नागवेकर याने द्वितीय क्रमांक पटविला तर तृतीय क्रमांकाचा मान कु. पौर्णिमा विजय कीर हीने मिळविला. त्याचबरोबर श्री. दिवाकर राजीव सुर्वे आणि श्री. विश्वास वामन शेंडे यांना उत्तेजनार्थ पारितोषीकासाठी निवडण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकांच्या पारितोषिकाची रोख रक्कम रु.५,०००/- मरिन सिंडीकेट प्रा.लि. यांचेकडून देण्यात आली.

या स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री. विजय मधुकर मयेकर, कु. संध्या रविंद्र सुर्वे आणि अँड. संदेश भरत नागवेकर यांनी काम पाहिले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर डॉ. श्रीरंग कद्रेकर (माजी कुलगुरु, डॉ.बा.सा.को.कृ.वि. दापोली), श्री. कुमारजी शेट्ये (माजी सभापती, पंचायत समिती रत्नागिरी) आणि श्री. सुहास पाटील (सामाजिक कार्यकर्ते), कै. सुधाकर नागवेकर यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा नागवेकर, मुलगे श्री. संदेश, श्री. संदिप (मुन्ना) आणि सचिन तसेच स्नुषा सौ.प्रेरणा संदेश नागवेकर, नात आदिती आणि संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष सुदेश नागवेकर, सदस्य मरिनर दिलीप भाटकर, सदस्य साईनाथ नागवेकर, खजिनदार श्री. विठोबा नागवेकर, श्री. राजेंद्र विलणकर (सदस्य) आणि डॉ. दिलीप नागवेकर तसेच परिक्षक उपस्थित होते. यांचे हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच याप्रसंगी डॉ. दिलीप नागवेकर यांनी शब्दांकन केलेल्या कै. सुधाकर नागवेकर यांच्या 'जीवन परिचय' पत्रकाचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कै. सुधाकर नागवेकर यांचे सोबत आकाशवाणीवरील कार्यक्रमात सहभागी झालेले वयोवृध्द श्री. विजय उर्फ बबन नागवेकर आणि श्री. रविंद्र नागवेकर यांनाही मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरुवातीस संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेऊन या स्पर्धेविषयी माहिती दिली. तर डॉ. दिलीप नागवेकर यांनी कै. सुधाकर नागवेकर यांचा जीवन परिचय करुन दिला. तर मरिनर दिलीप भाटकर यांनी संघाचे भविष्यातील उपक्रमाविषयीची माहीती करुन दिली.

स्पर्धेची सुरुवात उपाध्यक्ष श्री. सुदेशबुवा नागवेकर यांचे अभंग गायनाने झाली. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी बरोबर इतर सदस्य श्री. साईनाथ नागवेकर, श्री. राजेंद्र विलणकर, सौ. ऐश्वर्या कीर आणि सौ. प्रेरणा विलणकर यांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये श्री. साईनाथ नागवेकर यांनी आपला बहुमोल वेळ देऊन, परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करुन दाखविला. यावेळी परेश सुर्वे (रु.१०,०००/-), श्रीमती सुवर्णा सुधाकर नागवेकर (१०,०००/-), श्री. संतोष बोरकर (रु.५.५५५/-), श्री. अवधुत पेडणेकर (५,०००/-), श्री. प्रकाश मनोहर नागवेकर (५,०००/-), श्री. सुहास पाटील (रु.३,०००/-) श्री. सुरेश शेट्ये (१,०००/-), मरिन सिंडीकेट प्रा.लि. (रु.५,०००/-), भरघोस देणगी देऊन संघाला आर्थिक मदत करुन कार्याला आर्थिक बळ दिले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow