प्रो कबड्डी लिलाव : चिपळुणातील अजिंक्य पवारवर १.१० कोटीची बोली

Aug 21, 2024 - 10:59
Aug 21, 2024 - 11:04
 0
प्रो कबड्डी लिलाव : चिपळुणातील अजिंक्य पवारवर १.१० कोटीची बोली

चिपळूण : आगामी प्रो कबड्डी २०२४ तींगसाठी नुकतीच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया झाली. यामध्ये चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील अजिंक्य पकर या कबड्डीपट्टीवर बंगळूर बुल्स संघाने अखेर 1.10 कोटीची बोली लावून त्याला आपात्या संघात सामावून घेतले आहे. त्यामुळे अजिंक्य हा कोट्याधीश बनला आहे.

अजिंक्य पवार प्रो कबड्डी लीगमध्ये येण्यापूर्वी महिंद्रा आणि महिंद्रा संघाकडून खेळत होता. अजिंक्यसाठी सर्वात जाधी बेंगळूर बरसने बोली लावली होती. त्यानंतर तेलगू टायटन्सने त्याच्यावर ३० लाखांची बोली लावली. यूपी योद्धा आणि जयपुर पिंक पैथर्सनेही बोली लावती होती. बंगळूर बुल्सने अजिंक्य वर ६९.७५ लाखाची बोली लावल्यावा जयपूर पिकने नंतर ७० लाखांची बोली लावली. अजिंक्यची किंमत ८६ लाखापर्यंत गेल्यानंतर लगेच शर्यतीमध्ये यु मुंबाने भाग घेतला, दोन्ही संधांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटपर्यंत बेंगलोर बुल्सने त्याला सोडले नाही आणि अखेर १.१० कोटी रुपयांची बोली करीत अजिंक्यला आपल्या संघात घेतले. अजिंक्यची मूळ किंमत २० लाख रुपये होती, मात्र अखेर बंगलोर बासने १.१० कोटीची बोली लावून त्याचा आपल्या संघात समावेश करून घेतला अजिंक्य जाता बैंगलोर संघाकडून खेळणार आहे. अजिंक्यने पूर्व कबड्डी स्पर्धा गाजवली असून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, चिपळून कबड्डी असोसिएशन आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी अजिंक्यचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow