राजापूर : परूळेकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेत झाडांना बांधल्या राख्या

Aug 21, 2024 - 11:49
Aug 21, 2024 - 14:03
 0
राजापूर : परूळेकर माध्यमिक विद्यालयाच्या  विद्यार्थिनींनी  वृक्ष संवर्धनाची शपथ घेत झाडांना बांधल्या राख्या

राजापूर : तालुक्यातील वडवली येथील श्रीमती उमाताई शरद परूळेकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रशालेच्या आवारातील वृक्षांना औक्षण करून राखी बांधत वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबवण्याचा संदेश प्रशालेतील विद्यार्थिनींनी या अनोख्या उपक्रमातून साऱ्यांना दिला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पर्यावरणाचा रहास होत असल्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा हास थांबवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अपुरे ठरत आहेत. या स्थितीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत ठरणारी वृक्षतोड रोखणे आणि त्या द्वारे पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशाने वडवली येथील श्रीमती उमाताई शरद परूळेकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश साखळकर यांच्या प्रेरणेतून आणि ज्येष्ठ शिक्षक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबवला. त्यामध्ये प्रशालेच्या आवारातील वृक्षांना औक्षण करून राखी बांधून विद्यार्थिनीनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. २०० देशी वृक्षांची लागवड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी सुमारे २०० देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश दिला होता. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अनोख्या उपक्रमांमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow