चिपळूण : महामार्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन; सावर्डे येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित

Aug 22, 2024 - 11:43
 0
चिपळूण : महामार्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन; सावर्डे येथील रास्ता रोको आंदोलन स्थगित

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामे व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या निकाली काढण्यासाठी माजी तालुका प्रमुख संदीप सावंत यांनी सावर्डे येथे २१ रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सावंत यांच्या मागण्या मान्य करीत येत्या काही दिवसात त्याची पूर्तता करण्याचे आचासन दिल्याने सावंत यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र, दिलेले आश्वासन मुदतीत पुर्ण न झाल्यास येत्या २ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संदीप सावंत पांनी महामार्गावर सावडे, बहाळफाटा, कोंमडळा, टेरव फाटा या भागातील समस्यांची मांडणी केली. महामार्गावर वृक्ष लागवड करताना काजू या फळझाडाची लागवड करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचा अध्यादेश बैठकीत सावंत यांनी सादर केला. त्यानुसार महामार्गावर उपलब्ध जागेनुसार काजू लागवड करण्याची ठेकेदार कंपनीने हमी दिली. महामार्गाच्या चौपदरीकरणात सावर्डे पोलिस स्थानक तसेच तलाठी कार्यालय बाधीत झाले. या इमारतींच्या पुर्नबांधणीसाठी निधी मिळून सहा वर्षे झाली. परंतु, अद्याप या कामाला सुरवात झाली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत या इमारतींचा आराखडा प्राप्त करून तातडीने कामाला सुरुवात करण्याचे ठरले. कोंडमळा निवाचीवाडी येथील अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर येत्या आठ ते दहा दिवसांत उपाययोजना करण्याचे ठरले. त्यानंतर कोंडमळा येथील श्री भैरी मंदिराजवळ सुरक्षिततेसाठी क्रॉसिंगची व्यवस्थाही करण्याचे ठरवण्यात आले. वहाळ फाटा येथील अंडरपासच्या ठिकाणी कॉक्रिटीकरणाला तडे गेले आहे. याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच येथील सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्याचे ठरले. त्याचबरोबर कामथे येथून टेरव वेतकोंडवाडीकडे जाणाऱ्या जोड रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय सावर्डेसह महामार्गाला मिळणारे जोड रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे ठरवण्यात आले. येत्या दहा ते पंधरा दिवसात रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. निर्धारित वेळेत कामे मार्गी न लागल्यास २ ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी सावंत यांनी दिला.

या बैठकीला संभाजी पालशेतकर, सीताराम राणे, दिनेश वहाळकर, सोमा म्हालीम, सतीश सावंत, एकनाथ माळी, अरूण जाधव, साबर्डेचे पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड, इगल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow