संगमेश्वर : देवडे-मुंबई एसटी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Aug 21, 2024 - 13:54
 0
संगमेश्वर : देवडे-मुंबई एसटी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

संगमेश्वर : गेली अनेक वर्षे सुरू असलेली देवडे-मुंबई एसटी बस सायंकाळी देवडे येथून सुटत होती; मात्र कोरोना काळात ती बंद करण्यात आली. ही बस त्वरित सुरू करा, अशी मागणी आमसभेत शिवसेनेचे युवानेते बापू शिंदे यांनी केली. याबाबत आमदार निकम यांनी ही बससेवा सुरू करा, अशी सूचना एसटीच्या विभाग नियंत्रकांना दिल्या.

बससेवा बंद केल्यामुळे देवडे, किरबेट, भोवडे, भडकंबा, साखरपा येथील प्रवाशांना खासगी बसमधून दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत असल्याची तक्रार शिंदे यांनी केली. या मार्गावरील शेकडो प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन देवरूख येथील आमसभेत शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एसटीचे आगार व्यवस्थापक फडतरे यांनी तत्काळ वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून देवडे-मुंबई बससेवा पूर्ववत केली जाईल, असे सांगितले. देवडे येथून सोडण्यात येणारी बससेवा दादर-सायनमार्गे बोरिवलीपर्यंत करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार ती गाडी सुरू होण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी सभापती जया माने यांच्यासह जिल्हा वाहतूक नियंत्रक बोरसे यांच्याकडे संपर्क साधला असता बोरसे यांनी गणेशोत्सव लक्षात घेऊन ती बस सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. ही गाडी पूर्ववत चालू करण्यासाठी देवडे ग्रामविकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी दयानंद चिंचवलकर, लक्ष्मण शेडगे, अनिल वडये, प्रकाश कांबळे, विजय तळेकर, डॉ. चिंचवलकर व इतर मुंबई मंडळाचे कार्यकर्ते यांनी देखील विशेष प्रयत्न केले होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow