चिपळुण : 'केवायसी'च्या फेऱ्यात अडकली लाडकी बहीण

Aug 22, 2024 - 14:25
 0
चिपळुण : 'केवायसी'च्या फेऱ्यात अडकली लाडकी बहीण

चिपळूण : महायुती सरकारने हाती घेतलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चिपळूण तालुक्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रक्कम जमा होऊ लागली आहे: मात्र, बैंक खात्यास आधार लिंक नसल्याने १४ हजार ४१३ ग्राहकांना अजून पैसे काढ़ता आलेले नाहीत. त्यामुळे ही योजना 'केवायसी'च्या फेऱ्यात अडकली आहे. अशा महिला आधार लिंक करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत.

तालुक्यातील १४ हजार ४१३ बैंक ग्राह‌कांनी केवायसी करून बँकेतील खाते पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज केले आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या अनेक महिलांचे बैंक खाते केवायसीमुळे अपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यावर केवायसी झाल्याशिवाय पैसे जमा होणार नसल्याचे बैंक तसेच सेवा केंद्रातून सांगण्यात आल्याने या लाडक्या बहिणींनी बँकेसह बैंक सेवा केंद्रात केवायसी करून घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. १५ ऑगस्टपासून महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र, अनेकांनी अर्ज करून सुद्धा पैसे जमा न झात्यामुळे त्या बँकेमध्ये फेऱ्या मारत आहेत. केवायसीची अडचण असल्याचे बँकेकडून सांगितले जात आहे. त्यानंतर महिला केवायसी करण्यासाठी बँकांमध्ये गड़बड करत आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून, पात्र बहिणींना लाभ मिळावा यासाठी शासनाचे अनेक विभाग सक्रिय आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशासेविका, नागरी सुविधा केंद्रे, महसूल विभागाची सेतू कार्यालये यांच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज ऑफलाईन, ऑनलाईन भरून घेतले जात असल्याने येथेही महिलांची वर्दळ सुरू आहे.

पोफळी येथील सेंट्रल बैंकच्या शाखेत बाराशे ग्राहकांनी केवायसी करण्यासाठी अर्ज केला आहे. केवायसीनंतर त्यांचे बैंक खाते सुरू होईल. नावात बदल करण्याचे २० अर्ज आहे आहेत. यातील काही खाती पुन्हा सुरू करता येणार नाहीत. ती कायमस्वरूपी बंद झाली आहेत. - भावकांत लोकेश, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बैंक, पोफळी

बैंक ऑफ इंडियाच्या बहादूरशेख नाका येथील शाखेत केवायसीसाठी ८०० ग्राहकांनी अर्ज केले आहेत. केवायसीनंतर त्यांची खाती पुन्हा सुरू झाली आहेत. ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. - बी. कुमार गोकुळ, शाखा व्यवस्थापक, बैंक ऑफ इंडिया, चिपळूण


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow