गुहागर : मासूतील शिक्षकाच्या बदलीसाठी आंदोलन

Aug 10, 2024 - 11:26
 0
गुहागर : मासूतील शिक्षकाच्या बदलीसाठी आंदोलन

गुहागर : तालुक्यातील मासू शाळेतील एक शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कारणावरून अनेक प्रकारच्या शारीरिक शिक्षा करत आहे. या संदर्भात गटशिक्षाधिकारी लीना भागवत यांना लेखी तोंडी स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत; मात्र तरीही याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे.

शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करणे, त्याचे रागाने कपडे फाडणे, मानेजवळ हाताने दाबणे, कुचेष्टा करणे, जोराने हाताला धरून ओढणे, पोटात पेन खुपसणे, कानफाटात मारणे, डोक्यात पट्टी मारणे, मुलांच्या तोंडावर वही दाबून ठेवणे, स्वतःचा उपवास मुलांनाही उपवास धरायला लावणे, अशा अनेक शिक्षांनी विद्यार्थ्यांना दुखापत होऊ शकते. 

याबाबत लेखी तोंडी स्वरूपाच्या तक्रारी पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या नावे केल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक मेळाव्यात या शिक्षकाला समज देण्यात आली; परंतु आजपर्यंत कोणताच बदल झालेला नाही. पालकांनी या संदर्भात गटशिक्षाधिकारी लीना भागवत यांना लेखी तोडी स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत, तसेच वेळोवेळी फोनद्वारेही सांगण्यात आले. मात्र शिक्षकाची तीव्र बदलीची मागणी असूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. संबधित शिक्षकाची बदली करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यास शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामविकास मंडळाने तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow