ग्रामपंचायत म्हणजे गावविकासाचा मजबूत पाया : आ. शेखर निकम

Sep 14, 2024 - 12:14
 0
ग्रामपंचायत म्हणजे गावविकासाचा मजबूत पाया : आ. शेखर निकम

चिपळूण : सुंदर, सुसज्ज व सोईसुविधेने नटलेली ग्रामपंचायत म्हणजे गाव विकासाचा मजबूत पाया असतो. नांदिवसे ग्रामपंचायतीची येणाऱ्या काळात सुसज्ज इमारत असेल, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले. नांदिवसे ग्रामपंचायत इमारत व विविध विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत आ. शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नांदिवसे ग्रामपंचायतीत जागा कमी असल्याने कार्यालयीन कामे करणे खूप अडचणीचे ठरत होते. रस्त्यांची कामे होणे सुद्धा अत्यंत गरजेचे होते. नूतन ग्रामपंचायत इमारत मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांचे आभार मानले.

यावेळी सरपंच सायली शिंदे, गट विकास अधिकारी उमा पाटील, दिलीप चव्हाण, उपसरपंच संतोष शिंदे, नारायण सकपाळ, शशिकांत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow