भांडुप रेल्वे स्थानकावर मिळणार कोकण रेल्वेला थांबा

Aug 22, 2024 - 15:25
Aug 22, 2024 - 15:29
 0
भांडुप रेल्वे स्थानकावर  मिळणार  कोकण रेल्वेला थांबा

खेड : भांडुप रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेला थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दर्शवली असून प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटीची तरतूद केली आहे. तसेच उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन करणयात येणार आहे. त्यामुळे भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर आदी भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा फायदा होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या ठाण्यानंतर थेट दादर येथे थांबतात त्यामुळे पूर्व उपनगरात भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर आदी भागात राहणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या तेथून येणान्या चाकरमान्यांना दादर अथवा ठाणे येथे उतरून पुन्हा लोकल पकडून घरी यावे लागते. यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येथील चाकरमान्यांनी भांडूप येथे कोकण रेल्वेला थांबा द्यावा, अशी मागणी लावून धरती आहे. अखेर रेल्वे प्रशासनाने कोकणातून येणाऱ्या गावांना थांबा देण्याचे मान्य केले. अर्थात लोकल वेळापत्रकाचे नियोजन करून व प्लॅटफॉर्म क्रमांकाची लांबी वाढवल्यानंतर कोकण कन्या व तुतारी या दोन्ही गाड्यांना भांडुप रेल्वे स्टेशनवर थांबा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

भांडूप, घाटकोपरमध्ये ५ ते ६ लाख कोकणवासीय
पालिकेच्या एस विभागात येणाऱ्या भांडूप, कांदर, विक्रोळी या भागातील सुमारे ७ लाख ७२ हजार लोकसंख्येपैकी सुमारे तीन ते साडेतीन लाख कोकणी लोकवस्ती आहे. घाटकोपर एन विभागातील सुमारे ६ लाख ४६ हजार लोकसंख्यपैकी यापैकी सुमारे दीड लाखापेक्षा जास्त कोकणी पट्टा आहे. यात असल्फापासून भटवाडी व अन्य पश्चिमेकडील भागाचा समावेश आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow