आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार

Aug 22, 2024 - 15:35
 0
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार

रत्नागिरी : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील रत्नाकर सोनावणे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार आणि कु. जानवी रणधीर शिंदे या विद्यार्थिनीला राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या तीन पुरस्काराच्या निकषासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांत मुंबई विद्यापीठ, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत निर्देशित केलेले उपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी, तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांचा आधार घेण्यात आला. महाविद्यालयाला यापूर्वी २०१५-१६ करिता जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार, तसेच प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार मिळाला आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनावणे आणि विभागातील प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे आणि प्रा. पिया मोरे यांना सन्मानित केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड वेदा प्रभुदेसाई, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाला शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow