लांजा पुरवठा निरीक्षक राहुल शितोळेंची पदोन्नतीने रायगडला बदली

Sep 11, 2024 - 11:44
 0
लांजा  पुरवठा निरीक्षक राहुल शितोळेंची पदोन्नतीने रायगडला बदली

लांजा : लांजा पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक राहुल शितोळे यांची पदोन्नतीने बदली झाली असून, त्याबद्दल त्यांचा पुरवठा विभागाचे अधिकारी, तहसील विभागाचे अधिकारी आणि रेशनधान्य दुकान संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शितोळे हे गेली पाच वर्षे लांजा पुरवठा निरीक्षक म्हणून काम करत होते. पुरवठा विभागाचे योजनाबद्ध काम हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात उत्तमरित्या सुरू होते. तालुक्यातील रेशनधान्य दुकानांच्या वेळोवेळी तपासण्या करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण कारभार हा गतिमान आणि योग्य पद्धतीने सुरू होता. त्यांची माणगाव रायगड येथे बदली झाली आहे. पुरवठा निरीक्षक पदावरून त्यांची पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांना पुरवठा निरीक्षक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow