अॅड. विलास पाटणे यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
रत्नागिरी : येथील वकील, साहित्यिक, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे लिखित प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने न्यायमूर्ती ओक यांच्यासह उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधीज्ञ रत्नागिरीत येणार आहेत. येत्या शनिवारी (ता. १४) सकाळी १०.३० वा. माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
अॅड. पाटणे यांचे हे आठवे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये न्यायाधीश, विधीज्ञ वकील यांच्या आदर्शवत चरित्राविषयी लिखाण केले आहे. या कार्यक्रमाकरिता न्यायमूर्ती अभय ओक रत्नागिरीत येणार असल्याने न्यायालयीन वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:46 PM 9/11/2024
What's Your Reaction?