चिपळूणमध्ये श्री गणेशोत्सव मंडळातर्फे राममंदिराचा देखावा

Sep 6, 2024 - 11:36
Sep 6, 2024 - 15:04
 0
चिपळूणमध्ये श्री गणेशोत्सव मंडळातर्फे  राममंदिराचा  देखावा

चिपळूण : श्री गणेशोत्सव मंडळातर्फे ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत माधव सभागृह, भोगाळे, चिपळूण येथे विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील श्री राममंदिराचा देखावा यावर्षीचे प्रमुख आकर्षण आहे.

मंडळातर्फे ७ सप्टेंबरला दुपारी १२ वा. श्री गणेश प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ८ ला भजन मंडळ, ९ ला सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, भजन, रांगोळी स्पर्धा होतील. १० ला चिपळूण प्रज्ञाशोध परीक्षा, १० व ११ ला गौरीपूजन व १२ ला मारा विसर्जन होते. तीन दिवस संपूर्ण दिवसभर रंगावली प्रदर्शन आहे. १३ ला कथाकथन स्पर्धा, शारदा "मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम सावर्डे येथील अनन्या खेराडे व सहकारी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. 

१४ सप्टेंबरला रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शहरातील दहावी उत्तीर्ण गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम, संगीत विशारद निकिता सावंत यांच्या स्वरसिद्ध कला संगीत विद्यालयातील विद्यार्थी व गुरुवर्य यांचा अभंग, भक्तिगीत व भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे. १५ ला बुद्धिबळ स्पर्धा, महिलांच्या खुल्या गटासाठी पाककला होणार आहेत, शालेय व महाविद्यालयोन खुल्या गटासाठी अभिनय स्पर्धा होणार आहेत, सहेली ग्रुप चिपळूण यांचा संगीत भजनाचा व महाआरती होणार आहे. १६ ला श्री सत्यनारायण महापूजा, गणेश गौरव पुरस्कार सोहळा व गणेशोत्सवात झालेल्या विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण होणार आहे. शाहीर नीलेश महाडिकसह अविनाश महाडिक यांच्या प्रसिद्ध ग्रामीण जाखडी नृत्याचे आयोजन केले आहे. १७ ला महिलांच्या सामूहिक आवर्तने व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार असून, सायंकाळी श्रींचा विसर्जन मिरवणूक सोहळ्याची सुरवात होणार असून रात्री ८.३० वा. बाजारपूल चिपळूण येथे श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 06/Sep/2024


 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow