सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

Aug 23, 2024 - 10:12
 0
सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

नवी दिल्ली : कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यावर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सुरू असलेला बेमुदत संप निवासी डॉक्टरांच्या संघटनेसह एम्स संघटनेने गुरुवारी ११ व्या दिवशी मागे घेतला.

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर उपरोक्त वैद्यकीय संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने कोलकातील बलात्कार आणि खून घटनेसह डॉक्टरांच्या सुरक्षेची दखल घेतल्यामुळे संप मागे घेण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय संघटनातील सूत्रांनी दिली. दरम्यान, संप पुकारणाऱ्या डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे रुग्णांच्या हितापोटी त्वरित संप मागे घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 23-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow