रत्नागिरी : संगणक परिचालकांचे पालकमंत्री उदय सामंत यांना साकडे

Aug 23, 2024 - 10:11
 0
रत्नागिरी : संगणक परिचालकांचे पालकमंत्री उदय सामंत यांना साकडे

रत्नागिरी : ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध समस्यांसदर्भात चर्चा करून ग्रामीण भागातील संगणक परिचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेतर्फे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले. ना. सामंत यांनी संगणक परिचालकांच्या समस्या जाणून घेत, येत्या आठवडाभरात योग्य निर्णय जाहीर करण्याचाबत तसेच पर्यायी मार्गही काढून देण्याचे आश्वासन दिले.

मागील १२ वर्षांपासून ग्रामविकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून संगणक परिचालक राज्यातील जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. या सेवांसह शेतकरी कर्जमाफी, ग्रामीण घरकूल योजनेचा सर्व्हे पीएम किसान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सारख्या अनेक प्रकारचे काम करत असताना संगणक परिचालकांकडे मात्र राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. शासन निर्णयाद्वारे गापूर्वी सात हजार असलेले मासिक मानधनात ३ हजार रुपयांची वाढ करून १० हजार मासिक मानधन केल्याचे नमूद करण्यात आले. परंतु अद्याप संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा दिलेला नाही किंवा इतर कोणत्याही माध्यमातून नियुक्ती दिलेली नाही, त्यामुळे नाईलावास्तव दि. २६ ऑगस्टपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार असल्याचे संगणक परिचालकांनी स्पष्ट केले.

यावेळी तालु‌काध्यक्ष भूषण सुर्वे, उपाध्यक्ष समीर गोताड, सचिव आर्या कुंभार, आसिफ नाकाडे तसेच तालुक्यातील संगणक परिचालक बहु‌संख्येने उपस्थित होते.

आठवडाभरात निर्णय जाहीर करू
पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून संगणक परिचालकांना न्याय मिळवून देण्याषाका चर्चा केली. त्यावेळी मंत्री सामंत यांनी येत्या आठवडाभरात योग्य निर्णय जाहीर करण्याबाबत तसेच पर्यायी मार्गही काढून देण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow