चिपळूण येथील भाऊ काटदरे यांना 'पर्यावरण भूषण' पुरस्कार जाहीर

Aug 23, 2024 - 10:51
 0
चिपळूण येथील भाऊ काटदरे यांना 'पर्यावरण भूषण' पुरस्कार जाहीर

चिपळूण : एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या 'पर्यावरण भूषण' पुरस्कारासाठी चिपळूण येथील पर्यावरण संवर्धक भाऊ काटदरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते २३ ऑगस्टला सकाळी ९.३० वा. पुणे येथे पुरस्कार वितरण होणार आहे. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

काटदरे हे सह्याद्री निसर्गमित्रचे संचालक असून, गेल्या ३२ वर्षापासून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. कासव संवर्धन, गिधाड संवर्धन, खवले मांजर आणि वनसंवर्धनासाठी भरीव काम केले आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांनी पक्षी, प्राणी संवर्धनासाठी व्याख्याने दिली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow