कोंडगाव येथील निवृत्त अंगणवाडी सेविकेला मिळाला न्याय; रखडलेल्या मानधनाचा चेक मिळाला

Aug 14, 2024 - 10:54
Aug 14, 2024 - 11:02
 0
कोंडगाव येथील निवृत्त अंगणवाडी सेविकेला मिळाला न्याय; रखडलेल्या मानधनाचा चेक मिळाला

साखरपा : कोंडगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका रेश्मा शंकर अभ्यंकर यांचे रखडलेले सेवानिवृत्ती मानधन अखेर त्यांना मिळाले. त्यांना आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी त्यांनी प्रस्तावित उपोषण स्थगित केले आहे.

रेश्मा अभ्यंकर या अंगणवाडी सेविका म्हणून फेब्रुवारी २०१६ रोजी निवृत्त झाल्या. आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बालविकास अंतर्गत ३५ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले, ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर कोंडगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून त्या निवृत्त झाल्या.

अंगणवाडी सेविका निवृत्त झाल्यावर त्यांना एक लाख रुपये सेवानिवृत्ती मानधन मिळते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अभ्यंकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे सुपूर्दही केली होती. त्यांना आठ वर्षे झाली तरीही मानधन मिळालेले नाही. वारंवार विचारणा करून, लेखी अर्ज सादर करूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. अखेर रेश्मा अभ्यंकर यांनी स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती येथे लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला. अभ्यंकर यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली तसेच महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून स्मरणपत्रे सादर केली. चार महिने सातत्याने पाठपुरावा केला. याची गटविकास अधिकारी चौगले यांनी तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला. जिल्हा परिषदेकडून अभ्यंकर यांच्या निवृती मानधनाचा धनादेश जारी करण्यात आला. काल धनादेश कार्यालयात अभ्यंकर यांना देण्यात आला. त्यांनी उपोषण मागे घेतले. 


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow