लांजा : खेरवसे येथे आढळला शॅमेलिऑन

Aug 23, 2024 - 12:03
 0
लांजा : खेरवसे येथे आढळला शॅमेलिऑन

लांजा : अतिशय दर्मीळ समजला जाणारा शॅमेलिऑन हा रंग बदलणारा सरडा लांजा तालुक्यातील खेरवसे परिसरात रस्त्यावर दिसून आला. वाहनांखाली सापडू नये, म्हणून या दुर्मीळ सरड्याला पत्रकार प्रवीण कांबळे यांनी बाजूच्या जंगलात सोडले.

डायनासोर सारखा दिसणारा छोट्या आकाराचा सरडा परिसरात जास्त प्रमाणात नजरेस पडत नसल्याने शॅमेलिऑन पाहण्यासाठी कुतुहल निर्माण होते. अतिशय शांत आणि बिनविषारी प्राणी असून, काही ठिकाणी ग्रामीण भागात वेगवेळी नावाने ओळखतात. संपूर्ण भारतभर विविध प्रकारचे सरडे आढळतात. शॅमेलिऑन सरड्याचे खडबडीत दिसणारे व दोन्ही बाजूनी शरीर चपटे केल्यासारखे दिसते. वळलेली शेपूट, बारीक पाय, डायनोसारची आठवण करून देणारा  जबडा, असे त्याचे स्वरूप असते. मुंगळे, किडे, फुलपाखरू असे शॅमेलिऑन चे खाद्य आहे. झाडावर असणारा शॅमेलिऑन क्वचित जमिनीवर दिसतो. तहान लागली तरीही झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदूच पितो. अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्य आहे.

लांजा तालुक्यातील खेरवसे, बेनीखुर्द परिसरात शॅमेलिऑन मोठ्या प्रमाणात दिसून येतात. खेरवसे - बेनिखुर्द परिसरात अनेक विविध बागा, धरण, जंगलमय भाग असल्याने शॅमेलिऑन अनेकवेळा नजरेस पडतात. या परिसरात विविध पक्षी, फुलपाखरे यांचे वास्तव्य जास्त आहे. यामध्ये शॅमेलिऑनची भर पडली आहे.

गुरुवारी सकाळी प्रवीण कांबळे यांना रस्त्यावर चालत असताना शॅमेलिऑन सरडा दिसून आला. हळुवारपणे चालणाऱ्या शॅमेलिऑन रस्त्यावर वाहनांखाली सापडू नये, म्हणून त्याला बाजूला करून साईडच्या जंगल भागात सोडले. खेरवसे परिसरात अनेकवेळा शॅमेलिऑन दिसून आल्याने शॅमेलिऑनचा अधिवास असल्याचे निश्चित झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow