साखरपा येथे डंपरची कोल्हापूर- गणपतीपुळे बसला धडक

Jul 12, 2024 - 15:33
 0
साखरपा येथे डंपरची कोल्हापूर- गणपतीपुळे बसला धडक

रत्नागिरी : कोल्हापूर- गणपतीपुळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला डंपरची धडक बसल्याने अपघात झाला आहे. अपघातात चालक जखमी झाला. आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास साखरपा येथे हा अपघात झाला.

रत्नागिरी आगाराची बस क्र. (एम एच १४ बी टी २२२९) कोल्हापूर गणपतीपुळे मार्गावर धावत असताना बसला देवळे घाट येथे (डंपर क्र एम एच १० सी आर २५७३) ने धडक दिल्याने बस वळणावर घसरली. या अपघातात बस चालक जखमी झाला आहे. सुदैवाने बसमधील प्रवाशी जखमी नाहीत. त्यांना अन्य बसने मार्गस्थ करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow