पोलिस शिपाईपदासाठी ११ हजार ९५६ जणांची निवड

Aug 24, 2024 - 10:05
Aug 24, 2024 - 11:10
 0
पोलिस शिपाईपदासाठी ११ हजार ९५६ जणांची निवड

रत्नागिरी : राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर २०२२-२२ या पूर्ण वर्षातील एकूण १७ हजार ४७१ रिक्त पदांसाठी एकूण १६ लाख ८८ हजार ७८५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज प्रत झाले होते. त्यातील ११ हजार ९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांना नियुक्तीपत्रे देणे सुरू आहे. पात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकरच हजर होणार आहे.

पोलिस शिपाईपदासाठी एकूण ९ हजार ५९५ रिक्त पदांसाठी एकूण ४६ जिल्हा आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत 

४५ जिल्हा व आयुक्तालयांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडपात्र ७ हजार २३ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. फक्त मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरू आहे. चालक पोलिस शिपाईपदाच्या एकूण १ हजार ६८६ पदांसाठी एकूण २६ जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यापैकी २४ जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबई व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरू आहे तसेच बँन्डस्मन पोलिस शिपाई यांच्या एकूण ४१ पदांसाठी एकूण १४ जिल्हा व आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी १३ जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

१७ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राखीव पोलिसदलाच्या १९ गटांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व ठिकाणी निवडपात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर कारागृह शिपाई यांची १ हजार ८०० पदांसाठी ४ घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.

निवडपात्र उमेदवार असे
निवड झालेल्या ११ हजार ९५६ उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील २८९०, आर्थिक दुर्बल घटक ११३२, एसईबीसी १०९७, इमाव २५४२, विमाप्र २९३, भज-ड २४५, भज क ४४५, भज-ब ३३४, विजा-अ ३४४, अजा १०९८, अजा १५३९ बाप्रमाणे समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow