चिपळूण-गुहागर मार्गावर तांबी धरणाचे पाणी

Jul 9, 2024 - 10:06
 0
चिपळूण-गुहागर मार्गावर तांबी धरणाचे पाणी

चिपळूण : रविवार, दि. ७ रोजी झालेल्या जोरदार पावसामु‌ळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फटका बसला. या पावसामुळे चिपळूण- गुहागर मार्गावरील वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती. शहरालगतण्या उक्ताड, मिरजोळी येथे रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला होता. अनेकजण जीव धोक्यात घालून वाहने पुढे नेत होते. त्याचप्रमाणे चिपळूण-गुहागर मार्गावरील तांबी येथे तांबी धरणाचे पाणी चिपळूण गुहागार मार्गाला आल्याने देखील वाहतूक काही काळ ठप्प होती. या ठिकाणीही जीव धोक्यात घालून अनेकजण वाहने या पाण्यातून काढत होते. त्याच पद्धतीने तालुक्यातील निरव्हाळ येथील पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क चिपळूण-गुहागर मार्गाक्षी तुटला होता. 

चिपळूण परिसरात सरासरी २०० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे मार्गताताम्हाणे परिसरात २२५ मि.मी. पाऊस झाला असून, या पावसामुळे ग्रामीण भागात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे नदी, पऱ्हे किंवा ओढ्यालगतच्या शेतीमध्ये मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने नुकतीच लावणी केलेली भात रोपे पाण्याखाली गेली आहेत.

दरवर्षी मिरजोळी, उक्ताड येथे डोंगर माथ्यावरून पाणी येत असल्याने या ठिकाणी दरवर्षी चिपळूण गुहागर मार्ग बंद होतो व नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. यावर्षी देखील सातत्याने या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होत आहे. तरीही प्रशासन गात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणच्या समस्येवर राष्ट्रीय महामार्ग विभागाला अद्याप तोडगा काढता आलेला नाही. या बाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

चिपळूण-गुहागर मार्गावरील निल्हाळ येथे पुलावरून पाणी गेल्याने गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे गावचा संपर्क चिपळूणशी तुटला होता, सायंकाळी गावात परत येणारे अनेक नोकरदार यामुळे रस्त्यात अडकून पडले. येथील काही मुलांनी धाडस करून या लोकांना पाण्यातून सुखरूप पलिकडे नेले आणि त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्याचप्रमाणे चिपळूण-गुहागर मार्गावरील तांबी धरणाचे पाणी गुहागर गार्गावर आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. काही काळ या ठिकाणी चाहतूक ठप्प झाली होती. प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकजण धास्तावले. काहींनी तर पाण्याचा अंदाज घेऊन त्या पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढला.

कालुस्ते येथे रस्त्यावर आली दरड...
खाडीपट्टयाकडे जाणाऱ्या कालुस्ते घाटात रविवारी सायंकाळी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तत्काळ ही दरड बाजू‌ला करण्यात आली. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर माती आणि पाण्याचा लोंढा आल्याने वाहतूक ठप्प होती. सायंकाळी उशिराने दी माती बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow