समुद्रात वादळसदृश परिस्थिती; हजारो नौका बंदरात विसावल्या

Aug 24, 2024 - 10:35
Aug 24, 2024 - 10:42
 0
समुद्रात वादळसदृश परिस्थिती; हजारो नौका बंदरात विसावल्या

रत्नागिरी : कोकणात कालपासून समुद्राच्या किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या भागात कालपासून सतत पाऊस पडत आहे. 

नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला खरी सुरुवात झाली आहे. मात्र हवामान दिलेल्या अंदाजानुसार २४ ऑगस्टपर्यंत वादळाचा इशारा दिला होता. त्यामुळे कोकणातील मासेमारी ठप्प झाली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आलेल्या पावसाचा फटका परराज्यातील नौकांना बसला आहे. सर्वात सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदरची ओळख आहे. त्यामुळे बंदरात दरवर्षी हजारो परराज्यातील नौका येत असतात. त्यामुळेच परराज्यातील नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. गुजरात, डहाणू अशा भागातील शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow