महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीची रत्नागिरीत निदर्शने

Aug 24, 2024 - 10:34
 0
महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीची रत्नागिरीत निदर्शने

रत्नागिरी : महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीने काल टीआरपी येथील एसटी विभागोष कार्यालयाच्या बाहेर निदर्शन करण्यात आली. कृती समितीतर्फे कामगारांनी नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास ३ सप्टेंबरला पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. शुक्रवारी राज्यभरात कृती समितीने निदर्शन केली.

संयुक्त कृती समितीच्यावतीने शासनदरबारी मांडण्यात आलेल्या कामकाजाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. कृती समितीमध्ये महारा एसटी कामगार संघटन, कास्ट्रइच संघटक, कामगार सेना आदी संघटनांचा समावेश आहे. समितीचे पदाधिकारी राजेश मयेकर गौरेश नेवरकर, उमेश शेलार, अजित जाधव, मिलिंद कांबळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी संयुक्त कृती समितीला बैठकीसाठी २० ऑगस्ट तारीख दिली होती, परंतु यांच्या व्यस्ततेमुळे नियोजित बैठक न झाल्यामुळे एसटी कर्मचा-यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

कृती समिततर्फे आज हक्काचे राज्य मनाप्रमाणे वेदन मिळावे, आमची थकीत देणी त्वरित द्यावीत, जुलमी शिस्त आवेदन पद्धत यात बदल करावा, सर्वप्रकारमध्ये मोफत पास देण्यात यावा, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली तसेच आमचे प्रश्न मार्गी न लागल्यास ३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनावर कर्मचारी ठाम आहोत, असे राजेश मयेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow