चिपळूण : परशुराम घाटात प्रशासन लक्ष ठेवून

Jul 9, 2024 - 11:31
Jul 9, 2024 - 11:32
 0
चिपळूण : परशुराम घाटात प्रशासन लक्ष ठेवून

रत्नागिरी : जिल्ह्यासह चिपळूण परिसरातही गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, परशुराम घाटात रविवारी रात्री माती व मुरूम रस्त्यावर आल्याने वाहतूक थोडावेळ खोळंबली होती. मात्र, प्रशासन एक याची तात्काळ दखल घेत माती हटवून वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले. 

पावसाचा जोर पाहता येथील प्रशासनाने एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवले आहे. या सर्व परिस्थितीवर प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने,तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे आदी अधिकारी वर्ग लक्षात ठेवून आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 09-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow