दुचाकी अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल

Sep 9, 2024 - 11:05
Sep 9, 2024 - 15:05
 0
दुचाकी अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार 2 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वा. शिर्के पेट्रोल पंपासमोर घडली.

यश शरद पवार (24, रा.टी. आर. पी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात विनोद यशवंत कडू (रा. जुनी तांबट आळी, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एसी-5796) घेऊन शिर्के पेट्रोलपंप येथून एसटी स्टॅन्डकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत होते. त्याच सुमारास यश पवार आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-बीएफ- 3036) घेऊन दारूच्या नशेत भरधाव वेगाने एसटी स्टॅन्ड ते माळनाका असा जात होता. ही दोन्ही वाहने शिर्के पेट्रोलपंपा समोर आली असता यशने विनोद कडू यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात कडू यांना दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow