रत्नागिरी : मातृप्रेरणा आणि कुसुम हस्तलिखिताचे दिमाखदार प्रकाशन

Aug 26, 2024 - 11:20
Aug 26, 2024 - 12:24
 0
रत्नागिरी : मातृप्रेरणा आणि कुसुम हस्तलिखिताचे दिमाखदार प्रकाशन

त्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समितीचे रत्नकोंदण तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मातृप्रेरणा आणि कुसुम हस्तलिखिताचे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले.

रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दीपाताई पाटकर यांनी प्रमुख अतिथींचे गुलाबपुष्प आणि सेविका अंक देऊन स्वागत केले. दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यवाहिका मीराताई भिडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या प्रकाशनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शहर कार्यवाह वरुण पंडित तसेच विवेक अंकाचे प्रतिनिधी भरत इदाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

रेणुका प्रतिष्ठानच्या सचिव मानसी डिंगणकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथींच्या हस्ते मातृप्रेरणाचे प्रकाशन झाले. मातृप्रेरणा चे प्रकाशन झाल्यावर अर्चना वैशंपायन यांनी जिजामातेचे गीत सादर केले. त्यानंतर वरूण पंडित यांनी जिजामातेच्या मातृशक्तीचे अनेक पैलू वेगवेगळ्या वेळी घडलेल्या घटनांमधून उलगडून दाखवले. विवेकचे प्रतिनिधी भरत इदाते यांनी मातृप्रेरणा अंकाबाबत सांगितले. मातृशक्ती या विषयावर अनुराधा आपटे यांनी आपले विचार व्यक्त केले.

राष्ट्र सेविका समितीच्या कुसुम या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. प्रकाशनानंतर रत्नकोंदण प्रमुख सुनेत्रा जोशी यांनी रत्नकोंदणच्या उपक्रमाची माहिती थोडक्यात सांगून कुसुम हस्तलिखिताचा प्रवास तसेच हस्तलिखिताबाबत माहिती दिली. कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमाताई दांडेकर यांनी समारोपात दोन्ही अंकांबाबत बोलून आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर कार्यवाहिका शमिका गद्रे यांनी केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow