विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार : अशोक चव्हाण

Aug 26, 2024 - 12:37
 0
विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार : अशोक चव्हाण

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नेतृत्त्वात केला जाईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर होईल, अशी स्पष्टोक्ती भाजप खासदार अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) दिली.

एका वृत्त वाहिनीशी साधलेल्या संवादात त्यांनी महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी मराठा आरक्षण, बदलापूर अत्याचार प्रकरण, लाडकी बहीण योजनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले , आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. निवडणुकीच्या निकलानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? हे महायुतीतील सर्व पक्ष एकत्रीत ठरवतील. विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या हे पू्र्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे. जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे.

मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न : अशोक चव्हाण

मराठा आरक्षणावर बोलताना अशोक चव्हाणा म्हणाले, मराठा आरक्षणाच मुद्दा निवडणुकांशी जोडणार नाही कारण हा अनेक वर्षापासून सुरू असलेला मुद्दा आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 10% आरक्षणाचा फायदा जनतेला झाला आहे. ज्यांच्यकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळले आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी दिलासा मिळाला आहे. अजून काही प्रश्न प्रलंबीत आहे त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात येते. मात्र या सर्वपक्षीय बैठकीला ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते येत ना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपस्थित राहत नाही. मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न आहे.

बदलापूर प्रकरणी राजकारण करू नये : अशोक चव्हाण

बदलापूर अत्याचार प्रकरणी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, बदलापूरची घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेनंतर चिंतेचे वातावरण आहे. अशा घटनांचा पीडितेच्या आयुष्यावर तसेच तिच्या कुटुंबावर देखील परिणाम होतो. हा राजकीय मुद्दा नाही मात्र काही लोक गदारोळ माजवून त्यावर राजकारण करत आहेत, त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow