संगमेश्वर : बुरंबाड येथे गोकुळाष्टमीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

Aug 26, 2024 - 12:37
Aug 26, 2024 - 12:39
 0
संगमेश्वर : बुरंबाड येथे गोकुळाष्टमीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील श्री देव विष्णू मंदिरात यावर्षी गोकुळाष्टमी उत्सवाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

हा उत्सव २३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत साजरा होत आहे. त्यामध्ये २४ ला श्रींची पवनाभिषेक पूजा, आरती मंत्रपुष्य व रात्री कीर्तन झाले तर २५ ला सकाळी पवनाभिषेक पूजा, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, मुख्यदेवता, नवग्रह स्थापना श्रीवर पावमान पंचसूक्त, अभिषेक महापूजा, मुख्य हवन, बलिदान पूर्णाहूती, दुपारी ३ वा. माहेरवाशिणी व सासूरवाशिणींचा स्नेहमेळावा, आरती मंत्रपुष्प व कीर्तन होणार आहे. २६ ला श्रींची पवनाभिषेक पूजा, आरती, छबिना व रात्री श्रींच्या जन्माचे कीर्तन होईल तर २७ ला सकाळी श्रींची पवनाभिषेक पूजा कीर्तन, गोपाळकाला, महाप्रसाद होईल. रात्री १० वा. श्री विष्णू प्रासादिक नाट्यमंडळाचे श्री परा लघाटे (आरवती) लिखित एक नव कोर, सामाजिक, कौटुंबिक 'वास्तू तथास्तू' हे नाटक होणार आहे. याचे दिग्दर्शन रंग आनंद साठे यांनी केले आहे. रात्री २ वा. लळिताचे कीर्तन होणार आहे. उत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विष्णू देव न्यासाचे अध्यक्ष लक्ष्मण साठे व सचिव विकास जाधव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow