रत्नागिरी : धनेश पक्षी संवर्धनासाठी वने कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून संवर्धित करणे गरजेचे; अभ्यासक प्रतीक मोरे

Jun 4, 2024 - 13:11
 0
रत्नागिरी : धनेश पक्षी संवर्धनासाठी वने कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून संवर्धित करणे गरजेचे; अभ्यासक प्रतीक मोरे

रत्नागिरी : धनेश पक्षी संवर्धनासाठी काही राखीव वने ही संवर्धन राखीव किंवा कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून संवर्धित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभ्यासक प्रतीक मोरे यांनी केले. दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या 'धनेशमित्र संमेलना'त ते बोलत होते. नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून हे संमेलन आयोजित केले होते. यावेळी देवरूख येथील सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस, नवकिशोर रेड्डी, वानोशी फॉरेस्ट होम स्टेचे प्रवीण देसाई, देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले, 'नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन'चे वन्यजीव संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर, सृष्टीज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे आणि सह्यादी संकल्प सोसायटीचे डॉ. शार्दुल केळकर, धनेश पक्षी पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर उपस्थित होते.

डॉ. रोहित नानिवडेकर यांनी भारतातील धनेश पक्षी संवर्धनाचा उहापोह केला. त्यानंतर धनेश पक्षी संशोधक पूजा पवार यांनी पश्चिम घाटातील धनेश पक्षी संशोधनाचा आढावा मांडला. धनेश पक्षी संवर्धनासाठी अशा पद्धतीचे संमलेन होणे आवश्यक असून, त्यामधून वनविभागाठा देखील संवर्धनाची दिशा मिळते. असे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेडी यांनी सांगितले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. धनेशाच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी खासगी जागा मालकांनी पुढे येण्याची गरज असून, त्याठिकाणी आपण वनीकरणाचा प्रयोग करून अधिवासाचे पुनरुज्जीवन करू प्राकतो, असे नानिवडेकर यांनी सांगितले.

धनेशमित्रांचा सन्मान
धनेश पक्षी आणि इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्गमित्रांचा धनेशमित्र पुरस्काराने सन्मान केला. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनश्री फाऊंडेशन, प्रवीण सातोसकर, प्रवीण देसाई, विशाल सडेकर, पराग संगणेकर, भाग्यश्री परब, महादेव (काका) भिसे, गजानन शेट्ये, राहुल ठाकूर, वाईल्डवन तिलारी, मिलिंद पाटील यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:40 PM 04/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow