Lok Sabha Election Result 2024: अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर

Jun 4, 2024 - 12:32
 0
Lok Sabha Election Result 2024: अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सहा विद्यमान केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत.

स्मृती इराणी, कौशल किशोर, अजय मिश्रा टेनी, महेंद्र नाथ पांडे, अनुप्रिया पेटल आणि संजीव बालियान हे सहा मंत्री आहेत.

अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा ३२ हजार ६ मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी, बसपाचे नन्हे सिंह चौहान हे किशोरी लाल शर्मा यांच्यापेक्षा १ लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.

कोण किती मतांनी आहे मागे?

यूपीमधील महाराजगंजमधून कौशल किशोर हे समाजवादी पक्षाचे आरके चौधरी यांच्या मागे आहेत. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कौशल किशोर यांना १ लाख १९ हजार ८३६ मतं मिळाली आहेत. तर आरके चौधरी यांना १ लाख ६६ हजार ८८४ मतं मिळाली आहेत.

सध्याचे गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी हे यूपीतील खेरीमधून पिछाडीवर आहेत. समाजवादी पार्टीचे उत्कर्ष वर्मा हे १६ हजार ३०४ मतांनी अजय कुमार मिश्रा यांच्यापुढे आहेत. तसेच बसपाचे श्याम किशोर हे तिसऱ्या नंबरवर आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow