दापोली : रामराजे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात बनल्या रानभाज्यांच्या रेसिपी

Aug 28, 2024 - 10:42
Aug 28, 2024 - 13:55
 0
दापोली : रामराजे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात बनल्या रानभाज्यांच्या रेसिपी

दापोली : येथील रामराजे महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत रानभाज्यांचे प्रदर्शन नुकतेच उत्साहामध्ये झाले. या प्रदर्शनाला दापोलीकरांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायला हवे, या उद्देशाने रानभाज्यांच्या नावीन्यपूर्ण पाककृती बनवून विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केल्या होत्या.

या उ‌द्घाटन सोहळ्यास प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, डॉ. दीपक हर्डीकर, डॉ. प्रमोद सावंत, दिनेश जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्वाण, डॉ. सुस्मिता राजपुरे, प्राचार्या वेदिका राणे, श्री महेश जैन, योगेश जैन, धर्मेंद्र जैन, मुख्याध्यापक शेखर पाटील, आदी उपस्थित होते.

या अनोख्या प्रदर्शनामध्ये कुई, करटोली, चिचार्डी, कोवळा बांबू, भारंगी, टाकळा, सुरण, चुच, शेवगा, रानकेळी, फोडशी, प्याव, दार, केना, शतावरी, भुईआवळा, भारंगीची फुले, लालमाठ, ढाणकी, तेरी, अळू, यासारख्या तब्बल ४० हुन अधिक रानभाज्यांपासून बनविलेल्या पाककृती या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या होत्या. गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने रानमाया या प्रदर्शनाचे आयोजन या महाविद्यालयामार्फत आयोजित केले जाते. या प्रदर्शनासाठी संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे व अध्यक्षा सौ. स्मिताली राजपुरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. कुणाल मंडलिक, प्रा. जालिंदर पाटील प्रा. दुर्गा शिंदे व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow